मुंबई : दिग्गज टेक कंपनी टेक महिंद्राच्या शेअर्स(Tech Mahindra)मध्ये आज चांगली तेजी दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर ७ टक्क्यांनी मजबूत होऊन 1630 रुपयांवर पोहचला होता. टेक महिंद्राच्या शेअर्ससाठी हा या वर्षातील रेकॉर्ड आहे. आयटी कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे आपल निकाल जारी केले होते. कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली असून निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे.
शेअर बाबत पुढील स्ट्रॅटजी
ब्रोकरेज हाऊस CLSA ने टेक महिंद्रामध्ये आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. शेअरसाठी 1720 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टनुसार ३ महिन्यात ३५ टक्क्यांच्या तेजीनंतरही रिस्क रिवॉर्ड रेशो चांगला राहिला आहे.
ब्रोकरेज हाऊस मोतिलाल ओस्वालने शेअरमध्ये न्युट्रल रेटिंग दिली आहे. तसेच शेअरसाठी 1640 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ब
ब्रोकरेज हाऊस Citi ने टेक महिंद्रामध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासोबतच 1765 रुपयांचे टार्गेट दिले आहे.