या शेअर्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओ करा पावरफुल; दिग्गज ब्रोकरेज हाऊसचीही पसंती

तिमाही निकाल आणि वेगवेगळ्या रिसर्च नंतर ब्रोकरेज हाऊस आणि एक्सपर्टसुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. 

Updated: Aug 13, 2021, 02:08 PM IST
या शेअर्सच्या माध्यमातून पोर्टफोलिओ करा पावरफुल; दिग्गज ब्रोकरेज हाऊसचीही पसंती title=

मुंबई : शेअर बाजारात कमाईचा सिजन सुरू आहे. यामध्ये अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जारी झाले आहेत. कंपन्यांच्या निकालात संमिश्रपणा आहे. निकाल आणि वेगवेगळ्या रिसर्च नंतर ब्रोकरेज हाऊस आणि एक्सपर्टसुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. आज पुन्हा अशा स्टॉकची यादी तयार आहे ज्यामध्ये एक्सपर्टने खरेदीचा सल्ला दिला आहे. आज लिस्टमध्ये Eicher Motors, Tata Steel, Aurobindo Pharma, Bharat Forge, Page Industries, JSPL, Hindalco, Hero Moto, BPCL, Ashok Leyland यांचा सामावेश आहे.

Eicher Motors
तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊस जेफरीज यांनी Eicher Motors च्या शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांनी 3200 रुपयांचे लक्ष दिले आहे. मॉर्गन स्टॅनलेनेदेखील या शेअरला ओवरवेट रेटिंग दिली आहे. यासाठी 3145 रुपयांचे टार्गेट दिले आहे. बर्नस्टीननेदेखील आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. या शेअर साठी 2970 चे लक्ष दिले आहे.

Tata Steel
Tata Steelच्या शेअर्सला जेपी मॉर्गनने ओवरवेट रेटिंग दिली आहे. त्यासाठीचे टार्गेट 1810 रुपये इतके ठेवले आहे. तसेच जेफरीजने 1500 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.

Aurobindo Pharma
अरबिंदो फार्मामध्ये ब्रोकरेज हाऊस सिटीने गुंतवणूकीचा सल्ला देत 1170 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. 

Bharat Forge
भारत फोर्जमध्ये जेफरीजने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 1050 रुपयांचे लक्ष दिले आहे.

JSPL
JSPL च्या शेअरमध्ये मेक्कायरीने आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. त्यामुळे या शेअरसाठी 556 रुपयांचे लक्ष दिले आहे.

Hindalco
Hindalcoच्या शेअरसाठी मेक्कायरीने आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे. त्यासाठी 526 रुपयांचे लक्ष दिले आहे.

Hero Moto  
Hero Moto  मध्ये जेफरीजने होल्ड रेटिंग देत 3130 रुपयांचे लक्ष दिले आहे.

BPCL
बीपीसीएलमध्ये जेफरीजने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 520 रुपयांचे लक्ष दिले आहे.

Ashok Leyland
अशोक लेलॅंडनेसुद्धा जेफरीजमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 150 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.