अहमदाबाद: गुजरात सरकारकडून जगातील सर्वाच उंच पुतळा असा दावा करण्यात येत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे ३१ ऑक्टोबरला अनावरण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला पंतप्रधान मोदी या पुतळ्याचे अनावरण करतील, अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिली. या पुतळ्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे स्मारक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट मोठे असेल. भारतातील एकात्मतेचे प्रतिक म्हणून हा पुतळा ओळखला जाईल, असे त्यांनी सांगितले.
२०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली होती. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला होता. या पुतळ्यासाठी भाजपने देशभरातील नागरिकांकडून लोखंड, माती आणि पाणी गोळा करण्याचा उपक्रम राबवला होता.