SSC CGL 2017 चा निकाल जाहीर

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 

Updated: Nov 18, 2019, 11:09 AM IST
SSC CGL 2017 चा निकाल जाहीर  title=

मुंबई : स्टाफ सिलेक्शन कमिशनचा (Staff Selection Commission 2017) आज निकाल जाहीर झाला आहे. तब्बल दीड वर्षे उमेदवार या निकालाची वाट पाहत होते. (SSC CGL Result) स्टाफ सिलेक्शन कमिशनचा निकला अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला आहे. 

2017 मध्ये कमिशनद्वारे 9 हजारहून अधिक पदांसाठी घोषणा केली होती. याकरता एकूण 4,143 उमेदवार पास झाले असून ते CGL tier 1, tie-ll, tier-lll या तीन परिक्षा पास केल्या आहेत. 

उमेदवार या ठिकाणी पाहून शकतात आपला निकाल 

स्टेप 1 - या संकेतस्थळाला भेट द्या. https://ssc.nic.in/

स्टेप 2 - download result link वर क्लिक करा 

स्टेप 3 - रोल नंबरची उमेदवारांची पीडीएफ फाईल स्क्रिनवर दिसेल 

स्टेप 4 - ती फाईल डाऊनलोड करा. 

निकालानुसार जनरल कोट्याकरता 4144 पद रिकामे होते यावर 4143 उमेदवारांची निवड झाली आहे. ओबीसीमध्ये 1999 पद भरण्यात आली आहेत. तसेच एसीमध्ये 1322, एसटीमध्ये 656 उमेदवार भरण्यात आले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या आणि 10 व्या पे कमिशननुसार महिन्याला 4,800 रुपये पगार लागू होईल. 

एसएससी परिक्षेदरम्यान पेपर लिक होण्याच्या गोष्टी समोर आल्या होत्या. या वादामुळे आयोगाने परिक्षेचा निकाल जाहिर करण्यावर बंदी आणली होती. मात्र आता तब्बल दीड वर्षांनी निकाल जाहीर झाला आहे. एसएससी दरवर्षी सात प्रकारच्या परिक्षांच आयोजन करतात यामध्ये टायर 1, टायर II, टायर III आणि टायर IV परिक्षा घेतल्या जातात. या परिक्षेत उमेदवाराला गणित, इंग्रजी विषयांबरोबरच संगणाचे ज्ञान आहे की नाही याची परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत तब्बल 15.43 लाख उमेदवारांनी सहभाग घेतला होता. यामधील 2 लाख उमेदवारांनी टायर II ची परिक्षा दिली होती. याचा निकाल जाहीर केला आहे.