पटणा : स्पाइस जेट विमानाचं उड्डाण झाल्यानंतर काही मिनिटांत इमरजन्सी लँण्डिग करण्यात आलं आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पटणा विमानतळावर विमानाचं इमरजन्सी लँण्डिग करावं लागलं.
या विमानात 185 प्रवासी होते. या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवासी सुखरुप आहेत. इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ लँण्डिग करण्यात आलं.
पटणाच्या जयप्रकाश आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने 12.10 मिनिटांनी टेक ऑफ केलं. त्यानंतर काही मिनिटांत विमानाच्या पंख्याला आग लागली. ही आग खाली असलेल्या लोकांना दिसली.
विमानाच्या पंख्यातून आगीच्या ज्वाळा निघताना लोकांना दिसल्या. लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पाटणा पोलिसांना दिली. त्यानंतर या घटनेची माहिती विमानतळावर देण्यात आली. ही माहिती मिळताच विमानाचं इमरजन्सी लँण्डिग करण्यात आलं.
पटना से दिल्ली के लिए उड़ान @flyspicejet के विमान के इंजन में तकनीकी ख़राबी की वजह से विमान पटना एयरपोर्ट पर वापस लैंडिंग कराई विमान में नीचे की तरफ़ दिख रही हल्की हल्की चिंगारी। #spicejet #Patna #Airport #Emergencylending #plane pic.twitter.com/E6SwxMJnWx
— Digyanshu (TV100 NEWS) (@Digyanshu2) June 19, 2022
Delhi bound #SpiceJet flight returns to #Patna #Airport after reporting technical glitch which prompted fire in the aircraft. Most important, the local people of Patna had seen the fire in the plane,they immediately informed the administration and a big accident was averted. pic.twitter.com/8i0VqoNHoD
— Rajan Kumar Jha (@RealRajanjha) June 19, 2022