स्पाईस जेटने प्रवास करणं या कारणामुळे पडू शकतं महाग !

आता विमान प्रवासादरम्यान १५ किलो पेक्षा अधिक सामान घेऊन जाणं महागात पडण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 18, 2017, 06:11 PM IST
स्पाईस जेटने प्रवास करणं या कारणामुळे पडू शकतं महाग !  title=

मुंबई  : आता विमान प्रवासादरम्यान १५ किलो पेक्षा अधिक सामान घेऊन जाणं महागात पडण्याची शक्यता आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने सूट दिल्यानंतर स्पाईस जेटने प्री-बुकींग चार्जेसमध्ये वाढ केली आहे. १५ किलोपर्यंत कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही. पण २० किलोपर्यंत सामान घेऊन जात असाल तर ५०० रूपये अधिक म्हणजेच १४२५ रूपये खर्च करावे लागतील. 
 
 याप्रमाणेच तुमचे सामान २०-३० किलो असेल तर २००० रूपयांऐवजी  २८५० रूपये द्यावे लगतील. ३०- ४० किलो साठी ४२७५, ४५-६५ किलोसाठी ५७०० आणि ६५-९५ किलोसाठी ८५५५ रूपये द्यावे लागतील. जे प्रवासी १५ किलोपेक्षा अधिक बॅगेजसाठी प्री बुकींग करतील त्यांना ३०० रूपये प्रमाणे एअरपोर्ट काऊंटरवर चार्ज द्यावा लागेल. 
 
 दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालानंतर इतरही विमान कंपन्या त्यांच्या बॅगेज चार्जेसमध्ये वाढ करू शकतात.