गडबड घोटाळा! 'या' बड्या कंपनीनं अडीच वर्षांपासून थकवली कर्मचाऱ्यांची PF रक्कम

SpiceJet Financial Crisis: मासिक वेतनातून पीएफच्या नावाखातील अमूक एक रक्कम वजा तर होत राहिली. मग ही रक्कम गेली कुठं? कर्मचाऱ्यांमध्ये एकच संताप.   

सायली पाटील | Updated: Jul 9, 2024, 01:35 PM IST
गडबड घोटाळा! 'या' बड्या कंपनीनं अडीच वर्षांपासून थकवली कर्मचाऱ्यांची PF रक्कम title=
SpiceJet airlines not submitted employees pf fund employees epfo news latest update

PF Financial Crisis: पीएफ... नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच हा जिव्हाळ्याचा विषय. भविष्यनिर्वाह निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या PF खात्यामध्ये प्रत्येक कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठराविक रक्कम जमा केली जाते. पगारातून ही रक्कम वजा होत असली तरीही गरज असेल तेव्हा एका मोठ्या रकमेची उचल कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातून काढता येते. 

सध्या काही कर्मचारी मात्र याच PF मुळं चिंतातूर झाले आहेत. कारण, ते काम करत असणाऱ्या एका बड्या कंपनींन जवळपास मागील अडीच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये ही रक्कमच जमा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. 

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही कंपनी आहे, स्पाइजसेट ( SpiceJet). विमानसेवा पुरवणारी ही कंपनी बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशा या कंपनीनं पुन्हा एकदा मोठा गोंधळ घातला असून, त्यामुळं कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. कारण, साधारण अडीच वर्षांपासून या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात कोणतीही रक्कम जमा करण्यत आली नाही. 

कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफसाठीच्या रकमेचा वाटा वजा होत राहिला, पण हे पैसे EPFO मध्ये जमा न झाल्यामुळं आता एकच खळबळ माजली आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत हा खुलासा झाला असून, या अहवालानुसार 2022 मध्येच कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील योगदान बंद करण्यात आल्याचा खुलासा झाला. सदर प्रकरणी कंपनीला अनेकदा नोटीस आणि समन्स पाठवण्यात येऊनही कोणतंही उत्तर देण्यात आलं नसल्याचंही या अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : आम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं

 

माहितीच्या अधिकाराअंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये कंपनीकडून अखेरच्या वेळी 11581 कर्मचाच्यांच्या पीएफ खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली होती. त्यानंतरपासून मात्र या खात्यांमध्ये एक रुपयासुद्धा कमा करण्यात आलेला नाही. दरम्यान इतका मोठा खुलासा होऊनही अद्याप कंपनीनं मात्र कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.