नवी दिल्ली : एकमुखाने निवड झाल्यावर राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून आजपासून (शनिवार,16 डिसेंबर) सूत्रे अधिकृतरित्या स्विकारत आहेत. राहुल यांचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्विकारणे, आणि त्याच दरम्यान पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देणे. या पार्श्वभूमिवर कॉंग्रेस आणि राजकीय वर्तुळात चर्चा आणि कुतूहल असतानाच प्रियांका गांधी यासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात उतरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कुतूहल आणि चर्चा अधिकच व्याप्त स्वरूप धारण करत असल्याचे चित्र आहे.
राजकीय वर्तुळाच चर्चा आहे ती, अशी की, 2019मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी आपल्या अलिप्त आणि मर्यादीत राजकारणाचा त्याग करून सक्रिय राजकारणात प्रवेश करतील. त्यासाठी त्या सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबियांचा पारंपरीक मतदारसंघ रायबरेली येथून निवडणूक लढवतील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच, कॉंग्रेसवर निष्ठा असलेल्यांपैकी अनेकांचा मतप्रवाह हा प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात उतरायला हवे, असा राहिला आहे. त्यामुळे अनेका यापूर्वीही प्रियांका गांधींनी राजकारणात यावे असे मत अऩेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या राजकारणाबद्दल नेहमीच एक कुतूहल राहिले आहे. कारण, प्रियांका गांधी या राजकारणात होत्या आणि नव्हत्याही. त्यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवली नाही. मात्र, सोनिया आणि राहुल यांच्या प्रचारसभांमधून त्यांनी अनेकदा आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच, जाहीर सभाही घेतल्या आहेत. पण, रायबरेली आणि अमेटीबाहेर त्यांनी जाहीर सभा, किंवा प्रचार करणे नेहमीच टाळले आहे. त्यामुळे त्यांचे आतापर्यंतचे राजकारण हे अलिप्त आणि मर्यादीतच राहिले आहे. त्यामुळे 2019 मध्ये हे राजकारण भेदत त्या सक्रिय राजकारणात प्रवेस करणार का? याबाबत उत्सुकता आहे.