नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र आज हातात घेतली. यावेळी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेल्या सोनिया गांधी यांचं भाषण प्रभावी ठरलं.
काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी केलेल्या शेवटच्या भाषणात '२० वर्षांपूर्वी मी अशाच पद्धतीनं कार्यकर्त्यांना संबोधलं होतं... तेव्हा माझे हात कापत होते...' असं त्यांनी न बेधडकपणे सांगितलं.
'राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर माझा राजकारणाशी संबंध आला.... इंदिराजींनी माझा मुलीसारखं स्वीकार केला. जेव्हा इंदिराजींची हत्या झाली तेव्हा माझी आईच माझ्यापासून दुरावलीय. या घटनेनं माझं आयुष्यच बदलून टाकलं. मला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवायचं होतं... परंतु, माझ्या पतीनं देशाची जबाबदारी समजून पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या दिवसांत मी संपूर्ण देशाचा दौरा केला होता. परंतु, माझे पतीही माझ्यापासून दुरावले. तो माझ्यासाठी सर्वात कठिण काळ होता' असं सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटलं.