महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ

 राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ

Updated: Nov 25, 2019, 11:51 AM IST
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरुन लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ title=

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ झाला आहे. वेलमध्ये येत खासदारांना घोषणाबाजी सुरु केली. बॅनर आणि पोस्टर दाखवत ही घोषणाबाजी सुरु होती. लोकसभा अध्यक्षांनी शांती ठेवण्याचं आवाहन केलं. पण खासदार शांत होत नसल्याने अखेर अध्यक्षांनी या खासदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. लोकसभेचं कामकाज अध्यक्षांनी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे.

राज्यसभेतही अशाच गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकैया नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी, 'आज संसदेसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. संसदेच्या सदस्यांनी मार्शलसोबत हाणामारी नाही केली.'

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. सोमवारी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

आज लोकसभेत ३ महत्त्वाचे विधेयक सादर होणार आहेत. ई-सिगरेट बंदी विधेयकवर ही चर्चा होणार आहे. राज्यसभेत ट्रांसजेंडर पर्सन्स बिलवर चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता लोकसभेत आणि विधानसभेतही पोहचला आहे. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टात ही यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे.