कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता

शैलेश मुसळे | Updated: Apr 4, 2020, 12:34 PM IST
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने रुग्णालयातील १०८ जणांचा स्टाफ क्वारंटाईन title=

नवी दिल्ली : दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील स्टाफच्या १०८ लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या १०८ लोकांमध्ये काही डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफचा समावेश आहे. कोरोना व्हायरसची या स्टाफला लागण झाल्याच्या संशय असल्याने रुग्णालयाने हा निर्णय घेतला आहे.

रुग्णालयात २ असे लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत जे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत होते. सुरुवातीला या रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतेट लक्षणं दिसत नव्हती. पण जेव्हा त्यांची टेस्ट करण्यात आली तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

या २ रुग्णांच्या उपचारासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि इतर स्टाफला रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन केलं आहे. १०८ पैकी २३ जणांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर ८५ जणांना घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात देखील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या लोकांना देखील कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३८६ वर पोहोचली आहे. ज्यापैकी ९ जणं बरी झाले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.