चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या सोने-चांदीचे भाव

सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत.

Updated: Sep 23, 2020, 09:43 AM IST
चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या सोने-चांदीचे भाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी सराफा बाजारात चांदीच्या किंमती 5700 रुपयांपर्यंत घसरले आहेत. अमेरिकी डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे ग्लोबल बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत सराफा बाजारात एक किलो चांदीच्या किंमतीत 5781 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात 672 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे.

HDFC सिक्यरिटीजनुसार, दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध असणाऱ्या सोन्याच्या दरात 672 रुयांची घसरण होऊन 51,328 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. परदेशी बाजारात सोन्याच्या दरात 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून एका महिन्याच्या निचांकी पातळीवर पोहचले आहेत. 

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा दर 5781 रुपयांनी घसरुन 61,606 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. सोमवारी चांदीचा भाव 67,387 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. कोरोना काळात शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीकडे मोठा कल आहे.