'लाऊडस्पीकरबाबत न्यायलयाचा निर्णय न पाळणाऱ्यांना गोळ्या घालीन', श्री राम सेनेच्या प्रमोद मुथालिक यांची धमकी

कर्नाटकातील श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

Updated: Jun 2, 2022, 08:14 PM IST
'लाऊडस्पीकरबाबत न्यायलयाचा निर्णय न पाळणाऱ्यांना गोळ्या घालीन', श्री राम सेनेच्या प्रमोद मुथालिक यांची धमकी title=

कर्नाटकातील श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ध्वनिक्षेपकाशी संबंधित कायदा न पाळणाऱ्यांना त्यांनी इशारी दिला आहे. "सरकार माझ्या ताब्यात द्या, मी त्यांना गोळ्या घालीन. सुप्रीम कोर्टाच्या लाऊडस्पीकरच्या आदेशाचे पालन करण्यास नकार देणाऱ्यांना मी स्वतः गोळ्या घालेन", असे श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी म्हटले आहे.

सरकार कसे चालवायचे ते दाखवून देईन : मुथालिक

राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत मुथालिक म्हणाले की, त्यांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केली नाही. तुम्हाला सरकार कसे चालवायचे ते माहित नसेल तर ते माझ्या हाती द्या. सरकार कसे चालवले जाते ते मी दाखवून देईन. 

30 हजार मंदिरे परत घेणार : मुथालिक

श्री राम सेनेचे प्रमुख मुथालिक यांनी शनिवारी ज्ञानवापी प्रकरणावर मत मांडत पाडण्यात आलेली हिंदूंची 30 हजार मंदिरे परत घेतली जातील, असं सांगितलं होतं. निवेदनात मुथालिक म्हणाले होते की, "आमची 30,000 मंदिरे पाडण्यात आली आणि त्यावर मशिदी बांधण्यात आल्या़. त्या आम्ही परत घेऊ. कोणाची हिम्मत असेल तर थांबून दाखवा. बाबरी मशीद पाडताना तुम्ही रक्ताच्या नद्या वाहू असा इशारा दिला होता. त्याचे काय झाले. हिंदूंच्या रक्ताचा एक थेंबही तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्हाला जराही लाज वाटत असेल तर पूर्वी तोडलेली आमची मंदिरे आम्हाला परत द्या. संविधानाचे पालन करून कायदेशीर मार्गाने ती मंदिरे परत घेऊ."

मुथालिक यांच्या आधी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनीही मंदिर-मशीद मुद्द्यावर असेच वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले, "36000 मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या. त्यांनी त्यांच्या मशिदी इतर ठिकाणी बांधून नमाज अदा करावी. पण आम्ही त्यांना आमच्या मंदिरांवर मशिदी बांधू देणार नाही. सर्व ३६,००० मंदिरे कायदेशीररित्या परत घेऊ."