Delhi crime news : दिल्लीत झालेल्या श्रध्दा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान नुकतंच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केला. आपला पहिल्यापासून या लिव्ह इन रिलेशनशिपला विरोध होता, मात्र श्रद्धाने याचा विरोध केला, असं ते यावेळी म्हणाले. असे असताना आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे..
"Jaldi Jaldi Pat Jao Gurls" अशी कॅप्शन देऊन फेसबुकवर आता आफताबच्या (aftab amin poonawala ) नावाने एक अकाऊंटही सुरू करण्यात आलं आहे. या अकाऊंटला प्रोफाईल फोटो म्हणून आफताबचा फोटो वापरण्यात आला आहे. तर कव्हर फोटो म्हणून श्रद्धा आणि आफताब (Aftab Shraddha Case) यांचा फोटो वापरण्यात आला आहे. या सोशल मीडिया प्रोफाईलचे 613 फ्रेंड्सही आहेत. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथून असल्याचं या प्रोफाईलमध्ये म्हटलं आहे.
या प्रोफाईलवरुन दोन पोस्टही करण्यात आलेल्या आहेत. तसंच अन्वी वर्मा या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची अपडेटही देण्यात आली आहे. अशा प्रकारे आफताबच्या नावाने अकाऊंट सुरू करणे, त्यावरुन पोस्ट करणे हे अत्यंत असंवेदनशीलपणाचं असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. आफताबच्या क्रूरकृत्याचं कोणत्याही मार्गाने समर्थन नको, अशी भावनाही नेटकऱ्यांमधून उमटत आहे.
वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या 'या' मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिंदे-फडणवीस सरकार कोंडीत सापडणार?
दरम्यान श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आफताबने (Aftab Poonawala) श्रद्धाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. तसेच त्याने श्रद्धाला मारण्याचा प्लान आधीच केला होता असे देखील त्याने सांगितले आहे.