गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी चोरले ४४ लाख; पण....

सिनेमाला लाजवेल अशी घटना 

Updated: Dec 21, 2020, 08:13 AM IST
गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी चोरले ४४ लाख; पण.... title=

नवी मुंबई : गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी प्रियकर काहीही करतो हे आपण अनेक सिनेमांत पाहिलंच आहे. अगदी सिनेमाचीच वाटेल अशी सत्य घटना घडली आहे. प्रियकराने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मालकाचे तब्बल ४४ लाख चोरले. 

ही घटना दिल्लीतील बवाना परिसरातील आहे. जिथे एका नोकराने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मालकाचे तब्बल ४४ लाख रुपये चोरले आणि फरार झाला. चोर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मालकाचे बोलेरो ही कार देखील लंपास केली. 

या घटनेची मालकाने पोलिसात तक्रार नोंदवली. तपास करून इलेक्ट्रॉनिक सर्विलांसच्या मदतीने चोराला पैसे आणि गाडीसह अटक करण्यात आली आहे. मालकाची दिल्लीतील बवाना परिसरात फॅक्टरी आहे. अमित शाह नावाचा चोर याच फॅक्टरीत काम करत होता. १७ डिसेंबर रोजी फॅक्टरी मालकाने बँकेत जमा करण्यासाठी ४४ लाख दिले. आणि तेथेच अमितची नियत फिरली. पैसे बँकेत जमा करण्याऐवजी त्याने लंपास केले. 

४४ लाखांपैकी अमितकडे ३६ लाख आणि कार सापडली. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अमितला आपल्या गर्लफ्रेंडसोबत आनंदी आयुष्य जगायचं होतं. हे पैसे चोरल्यामुळे गर्लफ्रेंड खुश होईल आणि दोघं लग्न करून आनंदी आयुष्य जगतील. 

प्रेमात माणूस खरंच आंधळा होतो हे या घटनेवरून स्पष्ट झालं. प्रियसीच्या प्रेमात प्रियकर इतका वेडा झाला की, त्याने आपल्या मालकालाच फसवलं. यामुळे मालक आणि नोकरदार वर्गातील विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.