लखनऊ : सोशल मीडिया हे सर्वांसाठी एक मनोरंजनाचं साधन आहे. येथे लोकांना अनेक व्हिडीओ, फोटो आणि माहिती मिळते. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. तसेच सोशल मीडियावरती अनेक लोक ओळखी आणि मैत्री देखील वाढवतात. सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म जितकं चांगलं तिकतंच ते वाईट सुद्धा. कारण अशाच एका घटनेला बळी पडलीय ती एक महिला पोलिस कर्मचारी. ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला आहे. या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून एका तहसिलदाराशी मैत्री केली होती. त्यानंतर त्यांच्या गप्पा वाढल्या आणि त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं
दोघेही गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ही महिला कर्मचारी आणि तहसिलदार दोघेही विवाहीत आहेत. मात्र तरी देखील ही महिला कॉन्स्टेबल तहसिलदारावर लग्नासाठी दबाव टाकत होती. तिला तिच्या नवऱ्यासोबत नाही तर या तहसिलदारासोबत आयुष्य घालवायचे होते, ज्यासाठी ती आपल्या नवऱ्याला सोडायला देखील तयार होती.
परंतु तहसिलदाराला मात्र आपला संसार संपवायचा नव्हता. म्हणून शेवटी पर्याय न उरल्यानं त्याने या महिलेला संपलं असं पोलिस तपासात उघड झालं आहे.
ज्यानंतर या महिलेचा मृतदेह पोलिसांना एका गटारात सापडला, ज्यामुळे तपासात पोलिसांना वरील सर्वप्रकार उघड झाला.
पोलिसांनी तपास केला असता मृतदेह महिला कॉन्स्टेबल रुचि सिंहचा असल्याचे समोर आले. ज्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास घेण्यात आला आहे.
हे प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे पोलिसांना तपासात आढळलं आहे. महिला कॉन्स्टेबलची फेसबुकच्या माध्यमातून नायब तहसीलदारांशी मैत्री होती. हे समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कॉन्स्टेबल 13फेब्रुवारीपासून ड्युटीवर पोहोचली नव्हती आणि ती का येणार नव्हती यामागचे कारण देखील तिने कोणाला कळवले नव्हते. ज्यामुळे तिच्या सहकर्मचाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कारण रुचि सिंहचा फोन सतत बंद येत होता. बराच काळ संपर्क न झाल्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तक्रार दाखल केली.
लखनऊ येथील काली माता परिसरातील नाल्यात महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला होता. लखनऊच्या पीजीआय पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सुशांत गोल्फ पोलिस स्टेशनला याची माहिती दिली.
यानंतर कॉन्स्टेबल रुची सिंगसोबत काम करणारे साथीदार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत केली. यासोबतच बिजनौरमधील महिला कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांनाही पोलिसांनी माहिती दिली.
हे प्रेमप्रकरणाचे आहे, लेडी कॉन्स्टेबल रुचीचे एका कॉन्स्टेबलशी लग्न झाले होते. तिचा नवरा सध्या कुशीनगर येथे तैनात आहेत. त्यामुळे हे दोघेही वेगवेगळे राहात होते.
याप्रकरणी पोलीस आरोपी नायब तहसीलदाराची चौकशी करत आहेत. परंतु हा मृतदेह गटारामध्ये कसा आला हे मात्र पोलिसांना उघड झालेलं नाही. पोलिस या संपूर्ण घटनेचा शोध घेऊन आणखी माहिती गोळा करत आहेत.