धक्कादायक! फेसबूकने मोडला तरुणीचा विवाह

धक्कादायक प्रकार आला समोर

शैलेश मुसळे | Updated: Apr 24, 2018, 04:49 PM IST
धक्कादायक! फेसबूकने मोडला तरुणीचा विवाह title=

मुंबई : ज्या प्रकारे लोकांपर्यंत स्मार्टफोन पोहोचत आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर देखील वाढत आहे. युवा पिढी मोठ्या प्रमाणात सध्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत. काही लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून दुसऱ्याचं आयुष्य देखील खराब करतात. याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. कोलकात्यामधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

सोनारपूरमध्ये एका मुलीचा 2 दिवसात विवाह होणार होता. पण मुलाने फेसबूकवर तिचा एका मुलासोबत फोटो पाहून लग्न मोडून टाकलं. मुलाने म्हटलं की, या फोटोमध्ये मुलगी सिंदूर आणि साडीमध्ये दिसत आहे. ज्यामुळे मुलगी विवाहित असल्याचा संशय मुलाच्या कुटुंबियांना आला. या लग्नासाठी पत्रिका देखील सगळ्य़ांना वाटल्या गेल्या होत्या. सोनं खरेदी आणि कपड्यांची खरेदी देखील झाली होती. पण 2 दिवसाआधीच हा विवाह मोडला.

फेसबूकवर दुसऱ्या व्यक्तीसोबत मुलीचा असा फोटो पाहून मुलीच्या घरच्या व्यक्तींना देखील धक्का बसला आहे. मुलीच्या पित्याने म्हटलं की, 'माझ्या मुलीच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. आम्ही एका छोट्याशा गावात राहतो. आम्हाला सोशल मीडियाबाबत काही माहिती देखील नाही. आम्हाला नाही माहित की हे कोणी केलं आहे.'