पाणी पिताना चुकून मधमाशी गिळली, 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

Crime News In Marathi: पाणी पिताना मजुराने मधमाशी गिळली आणि काहीच वेळात त्याला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. या मजुराचा अखेर मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबश उडाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 9, 2023, 06:43 PM IST
पाणी पिताना चुकून मधमाशी गिळली, 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू title=
Shocking 22 year old man swallow bee dies

Crime News In Marathi: पाणी पिताना चुकून मजुराने मधमाशी गिळली अन् काहीच वेळात या तरुणाने प्राण गमावला. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ही घटना आहे. मधमाशी गिळल्याने 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनाही एकच धक्का बसला आहे. 

हिरेंद्र सिंह असं मयत तरुणाचे नाव असून तो मजुर होता. काम पाणी पित असताना त्याने अचानक मधमाशी गिळली. त्यावेळेस ती जिवंत होती. त्यामुळं मधमाशीने तरुणाच्या जीभेवर आणि अन्ननलिकेवर डंख मारला. या खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

मयत हिरेंद्र सिंह याचे वय 22 वर्ष होते. तो बैरसिया येथील मानपुरा गावातील रहिवाशी आहे. 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. त्या रात्री जेवण झाल्यानंतर हिरेंद्रने जेवण झाल्यावर पाणी प्यायले. पण रात्री आंधार असल्याने त्यात काय होतं हे मात्र त्याला कळलं नाही. थोड्यावेळाने जेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा कुटुंबीयांनाच नेमकं काय घडतंय हे कळलं नाही. त्याला त्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करे पर्यंत त्यांच्यात प्राण होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याने उलटी केली तेव्हा त्यासोबत मधमाशीदेखील बाहेर पडली. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी रुग्णालयातून फोन आला की एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक नरेंद्र कुलस्ते यांनी म्हटले आहे की, 6 डिसेंबर रोजी हिरेंद्र सिंह यांनी त्यांच्या घरी एक ग्लास पाणी पिताना चुकून मधमाशी गिळले. त्यानंतर त्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीनंतर लक्षात आले की त्याच्या अन्ननलीकेला सूज आली होती. उपचारानंतरही त्याच्या परिस्थितीत सुधार येत नव्हती. तेव्हा त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे 7 डिसेंबर रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला.