नवी दिल्ली : शिवसेना खासदारांनी लोकसभेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना खासदारांकडून होत आहे. ओला दुष्काळ संदर्भात शिवसेनेने स्थगन प्रस्ताव टाकला आहे. शिवसेना खासदार वेलमध्ये उतरले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं नंतर ऐकूण घेऊ असं म्हटलं आहे. शिवसेना खासदार सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर या गोष्टींचीच चर्चा होती. त्यामुळे आता शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत दिसत आहे, संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळ पाहायला मिळाला.
Delhi: Shiv Sena leaders hold protest near the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Parliament premises, demanding to declare unseasonal rains in Maharashtra as natural calamity pic.twitter.com/RvEHPOGMzl
— ANI (@ANI) November 18, 2019
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधेयकांसह अनेक मुद्यांवरून या अधिवेशनात भाजप सेना आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे आता शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून यापुढेही मोदी सरकारच्या धोरणांचा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
NDAतून बाहेर पडून विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी भाजपाविरोधात आंदोलन, @BJP4Indiaच्या विरोधकांमध्ये आता @ShivSena ची भर पडली असून हा विरोधक भाजपासाठी जड ठरणार आहे @rautsanjay61 @uddhavthackeray @ShivsenaComms @BJP4Maharashtra @NCPspeaks pic.twitter.com/dNbjVUBUY9
— Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) November 18, 2019
'महाराष्ट्र सत्ता स्थापनेचं केंद्र आता दिल्ली बनलंय. नागरिकता सुधारणा विधेयकावरही शिवसेना सरकारवर हल्लाबोल करणार आहे. राष्ट्रहिताचे मुद्दे शिवसेना संसदेत उचलेल.' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपाला संसदेत विरोध करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.