नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्राममध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मांस आणि चिकनची दुकानं बंद पाडली आहेत.
नवरात्रोत्सव असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुग्राममधील मांस आणि चिकनची ५०० हून अधिक दुकानं बंद पाडली आहेत.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालम विहार, सूरत नगर, अशोक विहार, सेक्टर पाच आणि नऊ, पटौदी चौक, जैकबपुरा, सदर बाजार परिसरातील मांस, मटणाची दुकानं बंद पाडली.
शिवसेनेचे गुरुग्राममधील प्रवक्ते ऋतु राज यांनी सांगितले की, आम्ही मांस आणि चिकनच्या दुकानदारांना यापूर्वीच नोटीस दिली होती. जर कुणी नियमांचं पालन करणार नाही तर त्याला परिणामांना सामोरं जावं लागेल.
50% of shops in Old Gurugram were already closed, those open were made to close by us: Ritu Raj (Shiv Sena spokesperson, Gurugram wing) pic.twitter.com/Px3dMeEgOR
— ANI (@ANI) September 22, 2017
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुकानं जबरदस्तीने बंद केली आहेत तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.