'बाई आहे ती, किती अक्कल असेल?' वकिलानं काढली महिला अधिकाऱ्याची अक्कल

चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये असलेल्या एकमात्र महिला अधिकारी श्वेतांबरी शर्मा यांना याआधीही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागलाय

Updated: Apr 18, 2018, 06:09 AM IST
'बाई आहे ती, किती अक्कल असेल?' वकिलानं काढली महिला अधिकाऱ्याची अक्कल  title=

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केलेत. एका महिला अधिकाऱ्याकडे या चौकशीची सूत्र सोपवल्यानं वकिलांना त्याबद्दल खात्री नाही. इतकंच नाही तर, 'बाई आहे ती, किती अक्कल असेल?' अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची अक्कलही काढलीय. 

या प्रकरणातील आठ पैंकी पाच आरोपींचे वकील असलेल्या अंकुर शर्मा यांची ही विधानं वादग्रस्त ठरलीत. एका चॅनलशी बोलताना त्यांनी म्हटलं, चौकशी अधिकारी एक महिला आहे... नव्या आहेत... आणि त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये असलेल्या एकमात्र महिला अधिकारी श्वेतांबरी शर्मा यांना याआधीही अनेक प्रश्नांचा सामना करावा लागलाय. 

श्वेतांबरी काय आहे. एक बाई आहे... तिच्याकडे कितीशी अक्कल असेल. त्या नव्या अधिकारी आहेत. कुणीतरी त्यांना खोटे पुरावे दाखवून त्यांची दिशाभूल केलीय, असं वकील अंकुर शर्मा यांनी म्हटलंय. 

ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे... आपल्या मनाला वाटेल तसे पुरावे मिळवण्यासाठी साक्षीदारांना प्रताडीत करण्यात आलंय.