मुंबई : Mastek लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात 514 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी या शेअरची किंमत 423.55 रुपये होती. आज या शेअरची किंमत 2800 रुपयांच्या आसपास आहे.
जर कोणत्याही गुंतवणूकदारांनी एका वर्षापूर्वी या कंपनीचे 1 लाख रुपयांचे शेअर विकत घेतले असतील. तर आज 1 लाखाचे 6 लाख रुपये झाले असते.
मंगळवारी हा शेअर BSE वर 4.3 टक्के तेजीसह आपल्या ऑल टाईम हायवर होता. कंपनीने तिमाही निकाल जारी केले होते.
कंपनीला चांगला नफा
मागील तीन महिन्यात हा शेअर 82 टक्के तर जानेवारीपासून 122 टक्के वाढला आहे. या शेअरची मार्केट कॅप 6313 रुपयांची झाली आहे.
कंपनीला जून 2021 च्या तिमाहीमध्ये 69.30 कोटींचा नेट प्रॉफिट झाला होता. त्याआधी मार्चच्या तिमाहीमध्ये कंपनीला 60.55 कोटींचा नफा झाला होता.
मास्टेक लिमिटेड ही एक डिजिटल क्षेत्रातील कंपनी आहे. भारतासह साधारण 41 देशांमध्ये आपल्या ग्राहकांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा पुरवते.