सुरक्षा दलाकडून अतिरेकी साजिद गिलकर ठार

 हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी साजिद अहमद गिलकर याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानाना यश आलं आहे. 

Updated: Jul 13, 2017, 01:34 PM IST
सुरक्षा दलाकडून अतिरेकी साजिद गिलकर ठार title=

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी साजिद अहमद गिलकर याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानाना यश आलं आहे. पोलीस उपायुक्त मोहम्मद आयुब पंडीत यांची क्रुरपणे हत्या करण्यात गिलकरची महत्त्वपूर्ण भूमिका होती अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

22 जून रोजी श्रीनगरमधील नोवहाटा भागात असलेल्या जामिया मशीदीबाहेर जमावाने उपायुक्त मोहम्मद पंडीत यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती.  त्याचबरोबर 22 एप्रिलला नोवहाटात सीआरपीएफवर झालेला ग्रेनेड हल्ला तसेच पीडीपी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यातही गिलकरचा सहभाग होता. 

बुधवारी बडगाम जिल्ह्यातील रेडबाग भागात झालेल्या चकमकीत अतिरेकी अकीब गुल आणि जावेद अहमद यांच्यासोबत साजिद गिलकरला ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.