भररस्त्यात महिलेने टॅक्सी चालकाला खेचून मारलं, नेमकं काय आहे प्रकरण?

महिलेने टॅक्सी चालकाच्या 5 कानाखाली लगावल्या

Updated: Nov 17, 2021, 08:02 AM IST
भररस्त्यात महिलेने टॅक्सी चालकाला खेचून मारलं, नेमकं काय आहे प्रकरण?  title=

मुंबई : प्रवाशी आणि चालक यांच्यात अनेकदा वाद होतात. आणि हे वाद इतक्या विकोपाचे असतात की, अगदी महरी तुमरी देखील होते. अशा वादाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला टॅक्सी चालकाला तुफान मारताना दिसत आहे. 

राजधानीत रस्त्यावर एका महिलेने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी महिला ड्रायव्हरची कॉलर पकडून त्याला कानाखाली आणि मारताना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, कॅब चालकाची तक्रार आल्यानंतर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.

RTO ला देणार माहिती 

हा व्हिडिओ पश्चिम पटेल नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस आता व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेचा तिच्या स्कूटीच्या नंबरवरून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि मास्क घातलेल्या महिलेने कॅब ड्रायव्हरला बेदम मारहाण केली.

व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक महिलाही शांतपणे उभी होती. तेथे उपस्थित लोकांच्या बोलण्यातून त्यांना मारहाण करणाऱ्या महिलेची चूक कळत असल्याचे दिसते. तर तिथे उपस्थित असलेले बाकीचे लोक या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसले.

गाडीतून खाली उतरवून मारलं 

ही घटना पश्चिम पटेल नगरच्या कस्तुरीलाल आनंद मार्गावरील ब्लॉक-22 ची आहे. ही महिला दुसऱ्या मुलीसोबत स्कूटीवरून जात होती. रस्त्यावरील कोंडीमुळे कॅब चालकाची कॅबही तिथेच अडकली होती. कॅब चालकाने महिलेला जागा न दिल्याने रागाच्या भरात महिलेने तिची स्कूटी रस्त्यावर उभी केली. यानंतर शिवीगाळ करत कॅब चालकाला ओढत बाहेर काढले.

यादरम्यान लोकांनी विरोध केला असता तिने आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडिओमध्ये ती कॅब ड्रायव्हरचा शर्ट पकडून त्याला थप्पड मारताना दिसत आहे. तर कॅब ड्रायव्हर बदल्यात तिच्यासोबत कोणतेही अश्लील वर्तन करत नाही. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली. व्हिडिओ शोधल्यानंतर, फरिदाबादमध्ये सापडलेल्या कॅब चालकाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दिलेली नाही.