नवी दिल्ली : भारतीय जीनोम वैज्ञानिकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करत बुस्टर डोस देण्याचा सल्ला देखील दिली आहे. पण हा बुस्टर डोस सगळ्यांनाच दिला जाणार नाहीये. वैज्ञानिकांनी 40 वयाहून अधिकच्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्याचा सल्ला दिलाय. तसेच इतर आजारांमुळे जोखीम असलेल्या व्यक्तींना ही बुस्टर डोस देण्याचा सल्ला देण्यात आलाय.
भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (INSACOG) च्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे की, जी कोविड-19 च्या जीनोमिक फरकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांची नेटवर्क आहे.
INSACOG बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, "40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो."
देशातील साथीच्या परिस्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान खासदारांनी कोविड लसींचा बूस्टर डोस देण्याची मागणी करत असताना ही शिफारस करण्यात आली आहे.