आग्रा : यमुना एक्सप्रेस-वे वर शुक्रवारी टायर फुटून झालेल्या बस अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर १६ मुले जखमी झालीत.
या बसमध्ये हिमाचल प्रदेशचे ५० विद्यार्थी होते. ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे येत असताना हा दुर्देवी अपघात घडला. या अपघातात अनेक मुले जखमी झालीत.
जखमींना आग्र्यातील एनएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुख्यमंत्री योगींनी जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिलेत.
हिमाचल प्रदेशातील आलोक भारती स्कूलची मुले ताज महाल पाहण्यासाठी आग्रा येत होते. बस यमुना एक्सप्रेसच्या रस्त्यावरुन आग्र्याच्या दिशेने येत होते. यावेळी खंदौलीजवळ बसचा पुढचा टायर फुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा टायर फुटल्यानंतर बस पलटी झाली आणि किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले. क्षणार्धातच चित्र बदलले. अनेक मुले बसमध्ये अडकली. त्यांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय.
#Visuals Several students injured after a bus carrying them overturned due to tyre burst on Yamuna Express highway near Agra pic.twitter.com/374t45g0PM
— ANI UP (@ANINewsUP) November 3, 2017