SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Updated: Aug 5, 2021, 11:08 AM IST
SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत title=

मुंबई : जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला. सध्या स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या जवळ पोहचला आहे. आज शेअर मजबूत होऊन 463 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरची 467 रुपये एका वर्षातील उच्चांकी आहे. दिग्गज ब्रोकरेज हाउसनेदेखील या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोविड 19 च्या आव्हानानंतरही बँकेने चांगले निकाल जारी केले आहेत. बँकेने आपल्या ऍसेट क्वॉलिटीचे चांगल्याप्रकारे व्यवस्थापन केले आहे.

शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला
ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवालने या शेअरसाठी 600 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. मोठ्या आव्हानंतरही बँक चांगले प्रदर्शन करीत आहे. प्रोव्हिजंस कंट्रोल केल्यामुळे बँकेचे उत्पन्न चांगले राहिले आहे. बँकेच्या ऍसेट क्वॉलिटीमध्ये पुढे देखील सुधारणा होण्याचे संकेत आहेत. लोन बुकमध्येदेखील चांगली कामगिरी केली आहे.

ब्रोकरेज हाउस जेफरीजनेसुद्धा शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. लक्ष 520 रुपयांवरून 550 रुपये ठेवले आहे. पुढत्या 2 तिमाहीमध्ये बँकेची ग्रोथ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेज हाउस मॉर्गन स्टैनलेने SBI मध्ये ओवरवेट रेटिंग दिली आहे. शेअरसाठी 600 रुपयांचे लक्ष दिले आहे.