SBI : दिवाळीच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पुन्हा एकदा आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिलीये. त्यामुशे SBI मध्ये तुमचं खाते असेल तर तुम्हाला ही याचा फायदा होऊ शकतो. बँकेने FD व्याजदर (FD व्याजदर) पुन्हा एकदा वाढवले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI ने सर्व मुदतीसाठी त्यांच्या FD च्या व्याजदरात 20 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू असणार आहेत.
FD वर वाढलेले व्याजदर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर रिटेल एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, FD व्याजदरात 10 बेसिस पॉइंट (bps) पासून 20 bps पर्यंत वाढ केली आहे.