'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का

मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.

Updated: Mar 14, 2018, 02:04 PM IST
'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का title=

इंदोर : मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, ठराविक कमीत कमी रक्कम अकाऊंटमध्ये न ठेवल्यामुळे एसबीआयनं गेल्या १० महिन्यांत तब्बल ४१.१६ लाख खाते बंद करण्यात आलेत. 

मध्यप्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना 'एसबीआय'नं ही माहिती दिलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, नुकताच देशातील सर्वात मोठ्या बँकेनं अर्थात एसबीआयनं याच मुद्यावर १ एप्रिलपासून दंड शुल्क ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, याचा फायदा मात्र या बंद झालेल्या खात्यांना मिळू शकणार नाही.