SBI Alert! दोन दिवसांनी बंद होणार या सुविधा

आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी 

SBI Alert! दोन दिवसांनी बंद होणार या सुविधा  title=

मुंबई : जर तुमचं खात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी. एसबीआयच्या 4 महत्वाच्या सेवा पुढील 2 दिवसांत बंद होणार आहे. 1 डिसेंबरपासून तुम्ही या चारही सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत महत्वाची काम आटपून घ्या. 

बंद होणार नेट बँकिंग 

जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही तर तुमची इंटरनेट बँकिंग सेवा किंवा ऑनलाइन बँकिंग सेवा बंद होऊ शकते. या संदर्भात बँकेकडून कायम नोटिफिकेशन पाठवून ग्राहकांना जागरूक केलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला नंबर लिंक करा. 

SBI Buddy लवकरच होणार बंद 

भारतीय स्टेट बँक आपलं मोबाइल वॉलेट SBI Buddy 1 डिसेंबरपासून बंद करणार आहे. बँकेनुसार आधीच ही वॉलेट सेवा बंद करण्यात आली आहे. परंतु ज्या ग्राहकांचे या वॉलेटमध्ये पैसे आहेत त्यांनी ते पैसे कसे काढावेत याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. 

जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची संधी 

जर तुमच्या कुटुंबात कुणी सेवानिवृत्त व्यक्ती असेल आणि त्यांच पेन्शन SBI मध्ये येत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी. 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच लाइफ सर्टिफिकेट बँकेत जमा करायचं आहे. प्रत्येक पेन्शनधारकांना याबाबत माहिती दिली आहे. सर्टिफिकेट जमा न केल्यास त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल. 

पेन्शन लोनची सुविधा संपणार 

एसबीआयकडून पेन्शनर्सला फेस्टिव सिझनमध्ये लोन देण्याची सुविधा सुरू केली होती. ही ऑफर त्या ग्राहकांना होती ज्यांची पेन्शन SBI च्या कोणत्याही शाखेत पेन्शन येते. या अंतर्गत कोणतेही प्रोसेसिंग फी न आकारता लोन मिळत होतं. ही सेवा 76 वर्षांच्या केंद्रीय, राजकीय आणि सेनेतून निवृत्त झालेल्या पेन्शन धारकांकरता असून ही सेवा 30 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे.