नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांता पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने काही प्रणाणात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं. मात्र, आता पून्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर २५० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. इराण आणि सौदी अरब यांच्यातील तणाव वाढतच आहे. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर होईल.
त्यामुळे २५० रुपये लिटर इतका पेट्रोल-डिझेलचा दर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, महागाईही मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
जर सौदी अरब आणि इराण यांच्यात युद्ध सुरु झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ५०० % ने वाढ होऊ शकते. युद्ध सुरु होताच कच्च्या तेलाची किंमत २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचू शकते.
इतकेच नाही तर ईराण आणि सौदी अरब यांनी एकमेकांच्या तेल रिफायनरीवर हल्ला केल्यास कच्च्या तेलाची किंमत ३०० डॉलर प्रति बॅरल होऊ शकते. त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किंमतीचा दर २५० रुपयांवर पोहचू शकतो.
केडिया कमॉडिटीचे एमडी अजय केडिया यांनी झी न्यूजशी बोलताना म्हटलं की, पेट्रोलचे दर २५० रुपये प्रति लिटर होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत २०० डॉलर प्रति बॅरल झाल्यास पेट्रोल २५० रुपये लिटर होईल. सध्या कच्च्या तेलाची किंमत ६२ डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक आहे.
अजय केडिया यांच्या मते, इराण आणि सौदी अरब यांच्यात युद्ध झालं तरी पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात येऊ शकतात. कारण, जगातील सर्वात मोठा क्रूड इंपोर्टर अमेरिकाही सध्या क्रूड एक्सपोर्ट करत आहे. तर, चीन आणि इतर देशांमध्येही कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झालेली नाहीये. त्यामुळे येत्या काळात कच्च्या तेलाच्या मागणीत कमी येऊ शकते.