India Post Recruitment: फारसं शिक्षण (Education) नाही, म्हणून कुणी नोकरीच देत नाही असं म्हणत नाराजीचा सूर आळवणं बंद करा. कारण, आता अवघं दहावीचं शिक्षण झालेल्यांनाही सरकारी नोकरी मिळू शकणार आहे. (Indian Post ) भारतीय पोस्ट खात्याकडून नुकतीच हजारो पदांसाठीच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जवळपास 40000 हून जास्त रिक्त पदांवर ही भरती प्रक्रिया होणार आहे.
तुम्हीही या नोकरभरतीमध्ये (job recruitment process) सहभागी होऊ इच्छिता, तर indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थावर भेट द्या. 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. त्यामुळं 40889 जणांमध्ये तुमचंही नाव येऊ शकेल फक्त थोडी घाई करा.
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती असून, इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. शिवाय दहावीमध्ये त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय असणंही अनिवार्य आहे. या पदासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील मंडळी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गांसाठी या अटीत सूट देण्यात येईल.
सदरील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 रुपये इतकी फी भरावी लागणार आहे. आरक्षित घटक आणि महिलांना ही अट लागू नसेल. कोणत्याही परीक्षेशिवास दहावीच्या गुणांच्याच आधारे उमेदरावांरांची निवड केली जाणार आहे. ज्यांची या पदांवर निवड होईल अशा मंडळींमधून पोस्टमास्तर पदी असणाऱ्यांना 12 हजार ते 29 हजार 380 इतकं वेतन असेल. तर, डाक सेवक म्हणून नोकरीवर रुजू होणाऱ्यांना 10 हजार ते 24 हजार 470 रुपये इतकं वेतन लागू असेल.
पोस्ट खात्यात नोकरीसाठी काही तारखा नक्की लक्षात ठेवा...
27 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2023 - अर्ज करण्याचा कालावधी
16 फेब्रुवारी 2023 - अर्ज भरण्याची अखेरची तारीख
अतिशय सोपी प्रक्रिया आणि नोकरीची ही सुवर्णसंधी हातची जाऊन देऊ नका. कारण, यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे.