Russia Ukraine War : रशियाची धमकी, 'तिसरं महायुद्ध झालं तर ते अणुयुद्ध असेल.'

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे.

Updated: Mar 2, 2022, 05:24 PM IST
Russia Ukraine War : रशियाची धमकी, 'तिसरं महायुद्ध झालं तर ते अणुयुद्ध असेल.' title=

कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीववर सतत बॉम्ब हल्ला करत आहे आणि क्षेपणास्त्रे डागत आहे. रशियन सैन्याने खेरसन शहर ताब्यात घेतले असून सैनिक खार्किवपर्यंत पोहोचले आहेत.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील बैठकीची दुसरी फेरी आज होणार आहे. यात काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे, ज्यामुळे युद्ध थांबेल. आज सकाळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणात म्हटले की, पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करून मोठी चूक केलीये. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध हळूहळू तिसऱ्या महायुद्धावर जाण्याची शक्यता आहे.

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज आणखी एक धक्कादायक वक्तव्य केलं. 'रशिया युक्रेनला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही. जर तिसरे महायुद्ध झाले तर ते अणुयुद्ध असेल आणि खूप विनाशकारी असेल.'