नवी दिल्ली : रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) चा वेळ वाढवून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केला आहे. आतापर्यंत 4.30 वाजेपर्यंतच RTGS व्यवहार केला जायचा. सकाळी 8 वाजल्यापासून RTGS ला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या वेळात RTGS च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यावर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. वेळेप्रमाणे शुल्क देखील बदलणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
RTGS व्यवहार सकाळी 8 वाजता खुला होणार असून ग्राहकांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर बॅंक अंतर्गत व्यवहारासाठी संध्याकाळी 7.45 आणि आयडीएल रिवर्सलसाठी संध्याकाळी 7.45 ते 8 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. वेगवेगळ्या वेळात RTGS च्या माध्यमातून व्यवहार केल्यास वेगवेगळे शुल्क भरावे लागेल. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर कोणते शुल्क लागणार नाही. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत च्या व्यवहारावर 2 रुपये, दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये आणि 6 वाजल्यानंतरच्या RTGS व्यवहारावर 10 रुपये शुल्क लागणार आहे. आतापर्यंत RTGS ने 2 ते 5 लाखापर्यंतच्या व्यवहारास 25 रुपये आणि 5 लाखाहुन अधिक रक्कमेवर 55 रुपये शुल्क लागते.
RTGS च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करण्यावर कोणतीही सीमा नाही. RTGS अंतर्गत ही सुविधा 1 जूनपासून लागू होणार आहे. RTGS व्यतिरिक्त पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर (NEFT) चा वापर होतो. यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कमेच्या व्यवहाराची सीमा नाही. RTGS सर्वात जलद मनी ट्रांसफर सेवा आहे. RTGS चा उपयोग बॅंक किंवा नेट बॅंकीगच्या माध्यमातून केला जाऊ शकतो.