वेगानं कार चालवताय... सेकंदाचं दुर्लक्ष आणि तुम्हाला जीव गमवावा लागू शकतो, व्हिडीओ

तुम्हालाही वेगानं कार चालवण्याची सवय असेल तर... नजर हटी दुर्घटना घटी! पाहा थरारक व्हिडीओ

Updated: Jul 5, 2021, 10:14 PM IST
वेगानं कार चालवताय... सेकंदाचं दुर्लक्ष आणि तुम्हाला जीव गमवावा लागू शकतो, व्हिडीओ title=

मुंबई: बऱ्याचदा आपल्याला ओव्हरटेक करायची वेगात गाडी पळवण्याची हौस असते. अशावेळी चुकूनही सेकंदासाठी आपलं लक्ष विचलित झालं तर काय परिणाम होऊ शकतात हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा थरारक व्हिडीओ कोणत्या भागातला आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र सध्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सेफ ड्राईव्ह करण्यावर चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नुकताच भीषण विचित्र अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघाताची घटना समोर आली. या व्हि़डीओमध्ये आपण पाहू शकता की दोन कार रस्त्यावरून धावत असताना पहिल्या कारचा वेग वाढतो आणि ती दुसऱ्या कारवर धडकते. दोन कारच्या धडकेत एक कार उलटी होते. तर दुसरी कार गरगर फिरते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by jatt.life(@jatt.life)

सेकंदासाठी चालकाची नजर चुकली आणि हा अपघाताचा थरार घडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून तरी या दोन्ही गाडीतील चालकांना कोणतंही मोठं नुकसान झालं नाही. मात्र वेगानं गाडी चालवण्यामुळे काय घडू शकतं नजर हटी दुर्घटना घटी हे वाक्य किती योग्य आहे हे या अपघातानंतर समजलं असेलच. सोशल मीडियावर अपघाता हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे.

मुंबई-पुणे दरम्यान अपघाताचा थरार, व्हीडिओ पाहून सांगा चूक कुणाची?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवसांपूर्वी भयंकर अपघात झाला होता. जड वाहनांना लेनमध्ये चालण्याची शिस्त दिसून येत नाहीय. या शिस्तीचे बळी ठरले आहेत, एकाच कुटूंबातील 3 जण खोपोलीजवळ बोरघाटात हा अपघात झाला होता.