Risk Management in Finance : शेअर बाजाराचा विषय आला म्हणजेच परताव्यासोबतच जोखिमेची देखील चर्चा होते. बाजारात गुंतवणूक करताना नेहमी एक वाक्य जोडलेले असते. ते म्हणजे बाजारातील गुंतवणूक जोखिमेच्या अधिन आहे. परंतु जोखिमेशिवाय नफा देखील मिळत नाही. हे ही सत्य. त्यामुळे बाजारात गुंतवणूक करताना काही नियम पाळायला हवेत. शिस्त लावायला हवी.
बाजाराची चाल आणि रिस्क
बाजाराची चाल पाहून गुंतवणूकीची स्ट्रॅटेजी बनवणे चुकीचे आहे. कारण बाजारात शॉर्ट टर्म उतार - चढ होत असतो. त्याचा परिणाम NAVवर होतो. परंतु दीर्घ कालीन गुंतवणूकीवर नाही. बाजाराची चाल बिघडल्यावर गुंतवणूक तोडल्याने जास्त नुकसान होते.
लक्ष आणि रिस्क
बाजारात गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय असतात तशीच रिस्क देखील असते. जसे की शॉर्ट टर्म गुंतवणूकीची रिस्क मध्यम असते. परंतु दीर्घ कालीन गुंतवणूकीची रिस्क एग्रेसिव असते.
डायवर्सिफिकेशन कसं कराल?
आपण किती जोखीम उचलू शकतो. हे आधी बघा. जोखमेच्या क्षमतेनुसार सेगमेंटची निवड करा. भविष्यातील टार्गेट सेट करा. त्यानुसार फंड निवडणे गरजेचे आहे. पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा. PPF, डेट फंड, इक्विटी गोल्ड, रिअल इस्टेट इत्यादींमध्ये गुंतवणूक करा.
ओवर डायवर्सिफिकेशन
पोर्टफोलिओमध्ये जास्त डायवर्सिफिकेशन करणं देखील बरोबर नाही. त्यामुळे नियोजन कोलमडण्याची शक्यता असते. टार्गेट च्या हिशोबाने फंडचे नियोजन करा.
शॉर्ट टर्म मार्केट ट्रेंड रिस्की
शॉर्ट टर्म मार्केट ट्रेंडवर गुंतवणूकीची स्ट्रॅटेजी बनवू नये. कोणत्याही ऍसेट क्लासमध्ये घसरण ही कमी कालावधीची असते. मार्केटच्या घसरणीमुळे इक्विटीमधून बाहेर पडणे योग्य नाही.दीर्घ कालीन फायद्यासाठी संयम आवश्यक आहे.
पोर्टफोलिओ रिबँलेन्सिंग
पोर्टफोलियो रिबँलेन्सिंगच्या माध्यमातून जोखिम कमी होण्यास मदत होते. दीर्घ कालीन गुंतवणूकीसाठी पुन्हा पुन्हा रिबँलेन्सिंगदेखील योग्य नाही.
रिबँलेन्स केव्हा करावं
तुमच्या फंड अलोकेशनचं समीकरण बिघडल्यावरच रिबँलेन्स करा. गुंतवणूकीच्या टार्गेटचा अवधी बदलला असेल तर रिबँलेन्स करा.
गुंतवणूकीची शिस्त
आपणच गुंतवणूकीचे मॉनिटर करू नये. गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. नंतर अखेरचा निर्णय तुमचा तुमच्या गरजेनुसार एसेटअलोकेशनची स्ट्रॅटजी बदला. समाधानी नसल्यास सल्लागार बदला.