ल्यूकेमियामुळे ऋषी कपूर यांचं निधन, जाणून घ्या काय आहे हा आजार?

ल्युकेमिया म्हणजे काय?  जाणून घ्या

Updated: Apr 30, 2020, 05:54 PM IST
ल्यूकेमियामुळे ऋषी कपूर यांचं निधन, जाणून घ्या काय आहे हा आजार? title=

मुंबई : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांनी जगाचा आज निरोप घेतला. ते गेल्या दोन वर्षांपासून ल्यूकेमिया या आजाराशी झुंज देत होते. हा रक्ताचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. 2018 मध्ये ऋषी कपूर न्यूयॉर्क येथे उपचारासाठी गेले होते. 2019 मध्ये एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी चाहत्यांना म्हटलं होतं की त्यांचा कर्करोग बरा होत आहे आणि काही आठवड्यात ते घरी परत येतील. या धोकादायक आजाराने मात्र त्यांना सोडले नाही. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

ल्युकेमिया म्हणजे काय? 

हा रक्ताचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो शरीरात पांढर्‍या रक्त पेशींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे होतो. पांढर्‍या रक्त पेशी वाढल्यानंतर त्या लाल रक्त पेशींवर वरचढ होतात. तसेच ते शरीर निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणार्‍या प्लेटलेटवरही वर्चस्व मिळवतात. जास्त प्रमाणात पांढऱ्या रक्त पेशीमुळे बरेच नुकसान होण्यास सुरवात होते.

यामुळे रक्तात विविध प्रकारची समस्या उद्भवू शकते. सुरुवातीला या आजाराचे कोणतेही लक्षण दिसत नाही. ल्यूकेमियामध्ये अशक्तपणा किंवा थकवा, लवकर रक्तस्त्राव, ताप, वारंवार संक्रमण, हाडांमध्ये वेदना, वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, डोकेदुखी, उलट्या यासारख्या समस्या उद्भवतात.

मेडिलकल वेबसाईट वेबएमडीच्या मते, कोणालाही ल्युकेमिया होण्याचे स्पष्ट कारण कोणालाच माहित नाही. ज्या लोकांमध्ये हा असतो त्यांच्यामध्ये असामान्य गुणसूत्र असतात, परंतु या गुणसूत्रांमुळे ल्यूकेमिया होत नाही. ल्युकेमियावर उपचार नाही. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे त्याचा धोका आणखी वाढू शकतो. उदाहरणार्थ, धूम्रपान, वी-किरण किंवा विशिष्ट रसायनांचा संपर्क, कुटुंबातील एखाद्याला ल्युकेमिया, काही प्रकारचे अनुवांशिक डिसऑर्डरमुळे देखील हा आजार होतो.

रक्तामध्ये काय होते? 

रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात - पांढऱ्या रक्त पेशी ज्या संक्रमणास विरोध करतात, लाल रक्तपेशी ज्या ऑक्सिजन वहन करतात आणि नप्लेटलेट्स ज्या रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात.

दररोज अस्थिमज्जा (अस्थिमज्जा) कोट्यावधी नवीन रक्त पेशी तयार करतात आणि त्यापैकी बहुतेक लाल पेशी असतात. परंतु ल्युकेमियामुळे शरीरात अत्यधिक पांढरे पेशी तयार होतात. रक्तातील सामान्य पेशी यामुळे सामान्य रक्त पेशींप्रमाणे संसर्गाविरूद्ध लढू शकत नाहीत. पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यप्रणालीवर ते परिणाम करण्यास सुरवात करतात. पण एक वेळ अशी वेळ येते की जेव्हा शरीरात ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरेसे लाल रक्त पेशीच उरत नाहीत.

ल्यूकेमियामुळे रक्तातील प्लेटलेट देखील रक्त गोठवण्यापासून त्याला वाचवू शकत नाहीत. पण जर शरीरात पांढर्‍या रक्त पेशींची संख्या कमी झाली तर कोणत्याही प्रकारच्या आजाराची लढा देण्याची क्षमता देखील कमी होते. यामुळे एखादी व्यक्ती बर्‍याचदा आजारी पडते. त्यामुळे ना कमी ना जास्त अशीच पांढऱ्या पेशींची अवस्था असावी लागते.