शेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले

अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे निर्णय येण्यापूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण झालीय

Updated: Jan 29, 2020, 01:54 PM IST
शेअर बाजारात तेजी, सोन्या-चांदीचे भाव घसरले title=

नवी दिल्ली : देशी आणि विदेशी शेअर बाजारात आलेल्या जोरदार तेजीमुळे महागड्या धातुंची चमक फिकी पडतेय. विदेशी संकेतांनुसार बुधवारी घरगुती वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सुस्ती दिसून आली. चीनमध्ये कोरोना व्हायरस (Corona Virus)च्या दहशतीमुळे सोन्या - चांदीच्या किंतमींत गेल्या काही दिवसांत जोरदार तेजी दिसून आली आणि शेअर बाजाराची चाल मंदावली. परंतु, आता शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे सोन्या - चांदीची चाल मंदावलीय. 

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लोकांना कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून संरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर जगातील प्रमुख शेअर बाजारांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे, कोरोना व्हायरसच्या साथीत चीनमध्ये १३२ जणांनी प्राण गमावलेत. 

जानकारांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे निर्णय येण्यापूर्वी सोन्याच्या किंमतीत घसरण झालीय. त्याचं कारण म्हणजे, बाजाराच्या अनुमानानुसार फेड व्याज दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी १०.१७ वाजता सोन्याच्या फेब्रुवारीच्या करारासाठी गेल्या सत्राच्या तुलनेत १४२ रुपयांच्या घसरणीसहीत ४०,१०० रुपये प्रती १० ग्रॅम किंमती मिळाली. तर यापूर्वी सोन्याच्या किंमती ४०,१११ रुपयांवर खुल्या झालाय आणि ४०,०६६ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरल्या.

तर वायदे बाजारात मार्चसाठीच्या करारात चांदीच्या किंमतीत २६ रुपयांच्या घसरणीसहीत ४५,४४८ रुपये प्रति किलो व्यवहार सुरू झाला. तर यापूर्वी चांदीच्या भाव ४५,३९० रुपयांवर खुला झाला आणि ४५,२५७ रुपये प्रति किलोपर्यंत घसरल्याचं पाहायला मिळालं.