Lifestyle Tips in Marathi : नवीकोरी साडी खरेदी केल्यानंतर तिची घडी मोडण्याआधी, म्हणजेच ती नेसण्यापूर्वी काही सोपस्कार आवर्जून केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे साडीला फॉल लावणं ( Saree Stitching Fall ). फॉल लावल्याशिवास बहुतांश महिला साडी नेसत नाहीत. पण, हा फॉल इतका महत्त्वाचा का बरं असतो? हा प्रश्न फार महत्त्वाचा नसला, तरीही तो विचार करण्याजोगा आहे आणि त्याचं उत्तरंही तितकंच रंजक आहे.
साडी कधीच Out Of Fashion नाही
काळ बदलला, तशी वेळ बदलली, माणसंही बदलली. पण, साडीचा ट्रेंड मात्र Out Of Fashion अर्थात गतकाळात गेला नाही. आजही कितीही ट्रेंड्स येवो, कितीही जावो पण, साडीवर असणारं महिला वर्गाचं प्रेम काही केल्या कमी होत नाही. भारताचं आणि साडीचं नातं तर, शब्दांतही मांडता येणार नाही इतकं खास आहे. साडीचे प्रकार, ती तयार करण्याची पद्धत, सर्वकाही अतिशय खास आहे.
नवी साडी (New saree) खरेदी केल्यानंतर महिला वर्गाची घाईगडबड सुरु होते ती म्हणजे साडीला फॉल लावून घेण्याची, साजेशा डिझाईनचं (Design) ब्लाऊज शिवून घेण्याची आणि शोभतील असे दागिने खरेदी करण्याची. फॉल न लावता साडी नेसण्याचा विचारही अनेक महिला करत नाहीत पण असं का? तुम्हाला माहितीये का याची सुरुवात केव्हा झाली?
सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार 1970 च्या आसपास साडीला फॉल लावण्यास सुरुवात झाली. यामागे एकच कारण होतं. ते म्हणजे साडी सुरक्षित ठेवणं. सुरुवातीला महिला फॉल नसणाऱ्याच साड्या नेसत होत्या. पण, असं केल्यानं साडीचाच खालचा भाग खराब होऊ लागला. यामुळं एक पर्याय शोधण्यात आला.
ब्लाऊज शिवणाऱ्यांनीच यावर उपाय शोधण्याची सुरुवात केली. साडीच्या किनाराला ईस्त्री करत ती व्यवस्थित बसवली जाऊ लागली. पण, तरीही किनार खराब होण्याच्या अडचणीवर काही तोडगा निघाला नाही. त्याचवेळी बेलबॉटम पँटच्या खालच्या भागात चैन लावली जात होती. पण, साड्यांमध्ये अशा पद्धतीची चैन लावण्याचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. त्यामुळं मुंबईतूनच साडीला फॉल लावण्याची (Fall biding saree) सुरुवात झाली. साडीच्या खालच्या बाजुला असणाऱ्या किनाराला यामुळं वजन प्राप्त झालं आणि ती खराबही होण्यापासून वाचत होती.
फॉल लावण्याची योग्य पद्धत
- साडीला अशा पद्धतीनं फॉल लावा की निऱ्या त्यामध्येच येतील.
- फॉल लावताना साडीच्या खाली कायम एखादी जाड गोष्ट घ्या. फॉलला लहान टाके मारा. साडीच्याच रंगाचा धागा फॉल लावण्यासाठी निवडा.
- फॉल लावण्यापूर्वी तो स्वच्छ धुवून घ्या.
- धुतलेल्या फॉलला ईस्त्री मारून त्यानंतरच तो साडीला लावा.