नवी दिल्ली : गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला चांगलीच टक्कर देतेय. भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या काँग्रेसने जी प्रगती केलीये त्यामागे अनेक कारणे आहेत.
काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये जनसंपर्क केला त्यामुळे काँग्रेसच्या प्रतिमेवर त्याचा थोडाबहुत परिणाम झाला. राहुल गांधी यावेळी अधिक आक्रमक दिसले.
१. जिग्नेश, हार्दिक, अल्पेशसोबत हातमिळवणी करणे - जिग्नेश, अल्पेश, हार्दिक यांच्यासोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसला त्याचा फायदा झालाय. जिग्नेश गुजरातमध्ये दलित आंदोलनाचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याने काँग्रेसला फायदा झालाय. दुसरीकडे हार्दिक पटेलमुळे काँग्रेसला गुजरातमध्ये फायदा झाला.
२. काँग्रेसने यावेळी हिंदू कार्ड खेळले - यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या उलट जात हिंदू कार्ड खेळले. यावेळी राहुल गांधींनी जानवे घातले, मंदिरात गेले. यामुळे काँग्रेसची प्रतिमा बदलण्यास मदत झाली.
३, राहुल गांधींची प्रतिक्रिया - मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नीच असे म्हटल्यानंतर त्यांना तात्काळ पदावरुन हटवण्यात आले.
४. शेतकऱ्यांमध्ये रोष - कर्जमाफी न दिल्याने कापूस उत्पादक शेतकरी आणि भुईमूगाची शेती करणाऱे शेती भाजपा सरकारवर नाराज होते.
५. जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयाने व्यापाऱ्यांचे पार कंबरडेच मोडले. त्यामुळे सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यास काँग्रेसला फायदा झाला.