NBFC News | RBI ने बदलले कर्ज देण्याचे नियम; आता येथून मंजूरीची गरज

RBI NBFC News : NBFCने अध्यक्ष एमडी किंवा त्यांचे नातेवाईक आणि संचालकांना 5 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज देऊ नये, असे RBIकडून सांगण्यात आले

Updated: Apr 20, 2022, 09:57 AM IST
NBFC News | RBI ने बदलले कर्ज देण्याचे नियम; आता येथून मंजूरीची गरज title=

मुंबई : RBI NBFC News : NBFCने अध्यक्ष एमडी किंवा त्यांचे नातेवाईक आणि संचालकांना 5 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज देऊ नये, असे RBIकडून सांगण्यात आले. याशिवाय कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पाला सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्यावरच मंजुरी दिली जाईल.

मुंबई : RBI NBFC News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांसाठी (NBFC) नियम कडक केले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राला सर्व परवानग्या मिळवल्यानंतरच कर्ज मंजूर करण्याच्या सूचना आरबीआयने एनबीएफसींना दिल्या आहेत

नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू 

एनबीएफसींने त्यांचे अध्यक्ष, एमडी किंवा त्यांचे नातेवाईक आणि संचालकांना 5 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज देऊ नये, असे आरबीआयकडून सांगण्यात आले. याशिवाय, एनबीएफसीचा संचालक जर कोणत्याही फर्ममध्ये भागीदार असेल, तर त्यालाही कठोर नियम लागू असतील. RBI ने बदललेले सर्व नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील.

आरबीआयने केलेल्या बदलांमध्ये असे म्हटले, एनबीएफसीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्ज दिले जाणार असेल तर, तर आधी बोर्डाला याची माहिती द्यावी लागेल.

कोणत्याही बिल्डरच्या रिअल इस्टेट प्रकल्पाला कर्ज मंजूरी तेव्हाच मिळेल जेव्हा प्रकल्पाला सर्व आवश्यक मान्यता मिळाल्या असतील.