RBIचा या दोन मोठ्या बँकाना दणका, तुमचे खाते या बँकेत आहे का?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील दोन मोठ्या बँकांना मोठा दणका दिला आहे.  

Updated: Oct 19, 2021, 08:12 AM IST
RBIचा या दोन मोठ्या बँकाना दणका, तुमचे खाते या बँकेत आहे का? title=

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील दोन मोठ्या बँकांना मोठा दणका दिला आहे. विविध मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल RBIने सोमवारी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 1 कोटी रुपये आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला  (Standard Chartered Bank) 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. (RBI imposed penalty on SBI and Standard Chartered Bank) 

एसबीआयने या सूचनांचे पालन नाही

आरबीआयने (RBI) एका निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय रिझर्व्ह बँक (व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे फसवणूक-वर्गीकरण आणि अहवाल) निर्देश 2016'मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एसबीआयला  (SBI) दंड ठोठावण्यात आला आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला दंड भरावा लागणार

याशिवाय, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एका स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की 'ग्राहक संरक्षण - अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांचे मर्यादित दायित्व', 'बँकांमध्ये सायबर सुरक्षा फ्रेमवर्क', 'बँकांचे क्रेडिट कार्ड ऑपरेशन्स' आणि वित्तीय सेवा स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 'आउटसोर्सिंगमधील आचारसंहिता' वर आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बँकिंग नियमन अधिनियम, 1949 अंतर्गत आरबीआयकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून हा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. 

राष्ट्रीयीकृत बँकेत क्लार्क या पदासाठी नोकरभरती 

दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँकेत क्लार्क या पदासाठी नोकरभरती होणार आहे. यात स्थानिक भूमिपुत्रांना संधी मिळावी यासाठी शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने बँकेच्या नोकरभरतीपूर्व परीक्षेचं ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केलेत. www.ibps.in या वेबसाईटवर 27 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावयाचाय..