मुंबई: Bank News :नियमांचे पालन न केल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India-SBI) 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा दंड 6 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात लावण्यात आला आहे.
केंद्रीय बँकेनुसार, SBI च्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी (ISE) तपासणीसाठी वैधानिक तपासणी 31 मार्च 2018 आणि 31 मार्च 2019 रोजी तिच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आदेशानुसार, जोखीम मूल्यांकन अहवालाची तपासणी, तपासणी अहवालात बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. SBI ने कर्जदार कंपन्यांच्याबाबतीत कंपन्यांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले होते.
यासाठी आरबीआयने (RBI) एसबीआयला (SBI) कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात राज्य बँकेला नियमांच्या या दुर्लक्षाबद्दल दंड का करू नये, अशी विचारणा करण्यात आली. बँकेच्या उत्तराचा विचार करून दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही कारवाई नियामक अनुपालनावर आधारित असल्याचे आरबीआयने (RBI) म्हटले आहे. बँकेने ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.