चेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल

 चेक व्यवहारात होणारे गुन्हे रोखण्यासाठी आरबीयचा निर्णय 

Updated: Sep 26, 2020, 04:14 PM IST
चेक पेमेंटमध्ये १ जानेवारीपासून होणार हे बदल  title=

नवी दिल्ली : पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला चेक पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व बॅंकेने यासंदर्भात नोटीफिकेशन जाहीर केलंय. ५० हजाराहून मोठ्या व्यवहारात या नियमांचे पालन होणार आहे. चेक व्यवहारात होणारे गुन्हे रोखण्यासाठी आरबीयने हा निर्णय घेतलाय.

पॉझिटीव्ह सिस्टिम 

१ जानेवारी २०२१ पासून पॉझिटीव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. यामध्ये ५० हजारहून मोठे व्यवहार असल्यास पुन्हा रि कन्फर्म करावे लागणार आहे. एसएमएस, मोबाईल एप, इंटरनेट बॅंकींग आणि एटीएससाठी हा चेक असेल. यामध्ये चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पेयी आणि रक्कम द्यावी लागेल. 

ही सर्व डिटेल्स बॅंकेतून पुन्हा तपासली जाईल. यामध्ये काही अडचण आढळल्यास यात सुधारणा केली जाणार आहे.

बॅंकांनी आपल्या ग्राहकांमध्ये एसएमएस अलर्ट, शाखांमध्ये प्रदर्शन, एटीएमसोबतच वेबसाईट आणि इंटरनेट बॅंकींगच्या माध्यमातून पॉझिटीव्ह पे सिस्टिमबद्दल माहीती देण्यास सांगितले आहे. या प्रणालीमध्ये बसणारे चेक सीटीएस ग्रिडमध्ये स्वीकारले जातील.  बॅंक सीटीएसच्या बाहेर जमा झालेले चेक समान व्यवस्था लागू करण्यासाठी स्वतंत्र असणार आहेत.