50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Updated: Dec 26, 2022, 04:14 PM IST
50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर title=

RBI annual report on 50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यात 50 पैसे चलनात असल्याचं उघड झालं आहे. याचा अर्थ असा की, 50 पैशांचा वापर व्यवहारात करू शकता. असं असताना आरबीआयने 50 पैशांची नवीन नाणी छापलेली नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 पैसे लीगल टेंडर असल्याचं सांगितलं आहे. आरबीआय नोटा आणि नाणी जारी करते. नोटा असो वा नाणी, त्याचे व्यवस्थापनही आरबीआयकडे असते. मात्र, नोटा आणि नाणी बाजारात पोहोचवण्याचे काम इश्यू ऑफिसकडून केले जाते. याशिवाय करन्सी चेस्ट आणि छोट्या नाण्यांच्या ठेवी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. देशभरात चलन चेस्ट आणि छोट्या नाण्यांच्या ठेवींचे जाळे आहे. 31 मार्च 2022 पर्यंत देशातील करन्सी चेस्टचे सर्वात मोठे नेटवर्क स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे. SBI कडे 53.6 टक्के आहे.

50 पैशांची किती नाणी चलनात?

आरबीआयच्या मते, चलनात 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी अस्तित्वात आहेत. यापैकी एकही नाणं बंद झालेलं नाही. फक्त त्याच्या डिझाईनमध्ये बदल होत राहतो. मात्र याचा अर्थ जुनी नाणी बंद झाली असा होत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार ही नाणी वैध आहेत. म्हणजेच कोणीही ही नाणी घेण्यास नकार देऊ शकत नाही. आरबीआय रिपोर्टनुसार, मार्च 2022 पर्यंत 50 पैशांची एकूण 1 लाख 47 हजार 880 नाणी चलनात आहेत. म्हणजेच 2020 पासून या नाण्यांची संख्या वाढलेली नाहीत. 2021-22 मध्ये चलनात असलेल्या नाण्यांचे एकूण मूल्य 4.1 टक्क्यांनी वाढल. तर याच कालावधीत एकूण प्रमाण 1.3 टक्क्यांनी वाढले.

बातमी वाचा- LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

2000 रुपयांची नोट चलनात

रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, 2000 रुपयांची नोट बंद झालेली नाही. आतापर्यंत छापलेल्या सर्व नोटा चलनात असतील. मात्र, नव्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. आरबीआयच्या अहवालाव्यतिरिक्त सरकारने लोकसभेत 2000 रुपयांच्या नोटेबाबतही स्पष्टीकरण दिले होते. आरबीआयने गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने नोटांची छपाई कमी केली असून आता नवीन नोटा छापल्या जात नसल्याचे सरकारने सांगितले होते.