Ratan Tata Produced Amitabh Bachchan Movie: प्रसिद्ध उद्योगपती, पद्मविभूषण आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. अनेक दिवसांपासून रतन टाटा यांची तब्येत खूपच चिंताजनक होती. अशातच काल रात्री त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु रतन टाटा यांची मृ्त्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी काल (09 ऑक्टोबर 2024) रोजी रात्री 11 वाजता त्यांचं निधन झालं.
रतन टाटा यांना बॉलिवूडमध्ये खूप रस होता. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. परंतु त्यांनी या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये कोणत्याही चित्रपटात पैसा लावला नाही.
रतन टाटांनी निर्मिती केलेला एकमेव बॉलिवूड चित्रपट
रतन टाटा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर विश्वास ठेवून या चित्रपटामध्ये पैसे गुंतवले होते. मात्र, अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पाहिजे तेवढी कमाई करू शकला नाही. हा चित्रपट प्रचंड प्लॉप ठरला. रतन टाटा यांना या चित्रपटामध्ये करोडो रुपयांचे नुकसान झाले. तेव्हा पासून त्यांनी एकाही चित्रपटामध्ये पैसे गुंतवले नाहीत.
2004 मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'ऐतबार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका संरक्षक वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ते एका वडिलांच्या भूमिकेत दिसले. जे आपल्या मुलीला तिच्या धोकादायक प्रियकरापासून वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जात होते.
चित्रपटाचे बजेट आणि चित्रपटाची कमाई
प्रेक्षकांना अमिताभ बच्चन, जॉन आणि बिपाशाचा अभिनय प्रचंड आवडला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहिजे तेवढी कमाई करु शकला नाही. या चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी रुपये होते. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने फक्त 7.96 कोटींची कमाई केली. हा चित्रपट बजेट इतके पैसे देखील कमाई करु शकला नाही. यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रतन टाटा यांनी पुढे कोणत्याही बॉलिवूड चित्रपटामध्ये पैसे गुंतवले नाहीत.