नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली.
मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली तेव्हा कोविंद यांच्या नावाची चर्चा झाली. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांना कोविंद यांनी पुन्हा शपथ घ्यायला लावली होती. तेज प्रताप यानं पहिल्यांदा 'अपेक्षित' असं म्हणण्याऐवजी 'उपेक्षित' असा उच्चार केला तसंच 'तेव्हा'च्या ऐवजी 'जेव्हा' असा उल्लेख त्यांनी केला.
मंचावरच त्यांची ही चूक सुधारत राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी तेज प्रतापला गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर त्यांना पुन्हा एकदा शपथ ग्रहण वाचण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानंतर तेजप्रतापनं मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची पुन्हा एकदा शपथ घेतली. तेजप्रताप यादव हा लालू यादव यांचा सर्वांत मोठा मुलगा आहे. नववी पास असलेले तेजप्रताप महुआ मतदारसंघातून निवडून आले आहेत.