राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून

राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

Updated: Sep 12, 2017, 11:04 AM IST
राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून title=

नवी दिल्ली : राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत हिच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीत, आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसलेली आहे. हनीप्रीत आणि आदित्य इंसाबरोबर आणखी एक व्यक्ती असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणा पोलिसांनी हनीप्रीतला शोधण्यासाठी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

३० वर्षीय हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी असल्याचा दावा आहे. राम रहिम बलात्कार प्रकरणात बीस वर्षाची शिक्षा भोगत आहे. बाबावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती ज्यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू देखील झाला होता. लाखो रुपयांच्या मालमत्तेचं यामध्ये नुकसान झालं होतं. पोलिसांनी बाबाच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करत अनेक गोष्टी उघडकीस आणल्या आहेत. तपासात रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहे. यामध्ये हनीप्रीतचा देखील सहभाग असू शकतो. एक सप्टेंबर रोजी हनीप्रीत विरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी केली गेली आहे.