मुंबई : भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेले दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेली नजारा टेक्नॉलॉजीने रस्क मीडियामध्ये मोठी भागीदारी खरेदी केली आहे. मंगळवारी कंपनीने फायलिंगमध्ये म्हटले की, त्यांनी रस्क मीडिया (rusk media)लिमिटेडमध्ये साधारण 2 कोटी रुपयांचे स्टेक खरेदी केले आहे. नजारा टेक्नॉलॉजीमध्ये राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे. जर कंपनीचा शेअर तेजीत आला तर, झुनझुनवालांची संपत्ती आणखी वाढेल.
1601 इक्विटी शेअर्सची खरेदी
नजारा टेक्नॉलॉजीच्या फायलिंगनुसार कंपनीने 25 ऑक्टोबरला रस्क मीडियामध्ये 10 रुपयांचे, 1601 इक्विटी शेअर खरेदी केले आहे. यासाठी 2 कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. या इक्विटी शेअर्सची खरेदी केल्यानंतर नजारा टेक्नॉलॉजीकडे रस्क मीडियाच्या पेड अप कॅपिटलपैकी 5.54 टक्के शेअर आहेत.
शेअर्समध्ये तेजीची शक्यता
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये नजारा टेक्नॉलॉजीचा शेअर घौडदौड करीत आहे. वर्ष 2021 मध्ये या शेअर्स या शेअरने आतापर्यंत 71 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात 20 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे. येत्या काही महिन्यात या शेअरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.