इंदूर : इंदोरमधील होळकर स्टेडियमवर एका खेळाडूने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
रजनीश गुरबानी याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रीक घेतली. 24 वर्षीय रजनीश गुरबानी याच्या जबरदस्त बॉलिंगमुळे विदर्भाने दिल्ली संघाला 295 धावांवर ऑलआऊट केले.
रजनीशने हॅट्ट्रीकची सुरुवात सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या अगदी सुरुवातीनंतरच केली. 44 वर्षांनंतर असं होतं आहे जेव्हा एखादा खेळाडू हा कारनामा करतोय. त्याआधी, 1973 साली, तामिळनाडूच्या बी कल्याण सुंदरमने मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक केली होती.
1972/73 मध्ये अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या बी कल्याण सुंदरम याने मुंबईविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. सुंदरमच्या शानदार प्रदर्शनानंतर तामिळनाडूच्या संघाला 123 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
सेमीफायनलमध्ये गुरबानीच्या कामगिरीमुळे, विदर्भाने कर्नाटकला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात, गुरबानीने 12 बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 7 बळी घेतले. त्यांच्या कामगिरीमुळे विदर्भाने कर्नाटकला पराभूत केले.